वणीमध्ये MD ड्रग्सचा सुळसुळाट! दरमहा एक कारवाई. वणीत MD येत कोठून. पोलीस मुळावर घाव करतील….

0
990

वणीमध्ये MD ड्रग्सचा सुळसुळाट! दरमहा एक कारवाई. वणीत MD येत कोठून. पोलीस मुळावर घाव करतील…

राहुल ठाकुरवार आणि प्रितम केशवाणी जेरबंद… पण खरे मास्टरमाइंड अजून मोकाट?

राजु तुरणकर – संपादक.

वणी शहरात MD (Mephedrone) सारख्या घातक ड्रग्सचा काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. पोलिसांनी कारवाई करत राहुल दिलीप ठाकुरवार (वय 40) आणि प्रितम केशवाणी (वय 44) यांना ताब्यात घेत तब्बल ₹2,30,440 चा मुद्देमाल जप्त केला.

पण इथूनच सुरू होतात खरे प्रश्न…हे दोघेच का? की फक्त “फ्रंटवरचे” लोक? या मागे असलेले मोठे पुरवठादार कोण? वणीमध्ये ड्रग्स इतक्या सहज फिरत होते, तर प्रशासन झोपेत होतं का?

देशमुख वाडी परिसरात उघडपणे ड्रग्स विक्री सुरू होती, म्हणजेच हा प्रकार नवीन नाही. मग इतके दिवस कारवाई का झाली नाही?की मुद्दाम डोळेझाक केली जात होती?  युवकांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे!

वणी शहरात MD (Mephedrone) सारख्या घातक ड्रग्सचा खुलेआम व्यापार सुरू असल्याचे सातत्याने पोलिसांच्या कारवाईमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन आरोपींना पकडून पोलिसांनी २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला… पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरितच!

हे ड्रग्स शहरात आले कुठून? कोण चालवतंय हा संपूर्ण रॅकेट?आणि अजून किती तरुण या नशेच्या जाळ्यात अडकले आहेत?

पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असली तरी, फक्त लहान माशांना पकडून मोठे मासे सोडले जातायत का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. MD सारख्या सिंथेटिक ड्रग्समुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे, आणि तरीही हे जाळे वाढतच चालले आहे.

पोलीस प्रशासनाला थेट सवाल –फक्त राहुल ठाकुरवार आणि प्रितम केशवाणी यांनाच पकडून केस संपणार का? की या प्रकरणातील पायमुळे खोदून काढले जातील , फक्त कारवाई दाखवण्यासाठी ही धडक कारवाई ? की खरंच संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त होणार? या मागे असलेल्या मोठ्या लोकांपर्यंत हात पोहोचणार का? फक्त अटक नाही, तर संपूर्ण ड्रग्स नेटवर्क उघड करा,  युवकांना वाचवा, नशेचा बाजार बंद करा दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी वणीकर जनता आता चर्चा करतांना दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here