अण्णाजी वावरकर यांना पत्नी शोक.

0
622

सौ. सुमन अण्णाजी वावरकर यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन.

अण्णाजी वावरकर यवतमाळ यांना पत्निशोक.

लोकवाणी जागर वृत्त .

प्रभात सोसायटी यवतमाळ येथील अण्णाजी नारायण वावरकर यांच्या पत्नी सुमन अण्णाजी वावरकर यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन. त्या 70 वर्षांच्या होत्या.

दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ला रात्री 10:30 ला सौ. सुमन अण्णाजी वावरकर यांची अचानक तबीयत बिघडल्या मुळे क्रिटीकेअर हॉस्पिटल यवतमाळ मध्ये भर्ती करण्यात आले, डॉक्टरांनी तात्काळ उपाय सुरू केले. परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी 11: 40 मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.

आज 18 फेब्रुवारी रविवारला दुपारी 12 वाजता यवतमाळ वडगाव येथील मोक्षधाम मध्ये  अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पती , मुलगा सुशील वावरकर, तीन मुली सौ गीता तूरणकर, विद्या काटकर व संध्या केने व जावई नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.व वावरकर परिवारास या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो.

शोकाकुल — राजू तूरणकर परिवार वणी, विवेक काटकर परिवार हिंगणघाट, आशिष केणे परिवार भद्रावती (अकोला).

मनी होता भोळेपणा, कधी न दाखविला मोठेपणा, चेहरा होता सदा हसतमुख, सर्वांना दिला आनंद खुप, अजुनी होतो भास, तुम्ही आहात जवळपास, शांती लाभो तुमच्या आत्म्यास हीच विनंती परमेश्वरास.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here