“वाढदिवशी वणीत एकच चर्चा… संजय खाडे यांनी एवढं वैभव कमावलं तरी कुठून?”

0
947

“वाढदिवशी वणीत एकच चर्चा… संजय खाडे यांनी एवढं वैभव कमावलं तरी कुठून?”

संजय खाडेंच्या वाढदिवशी नेमक काय घडल ?

रक्तदान शिबिर, वृद्धाश्रम भेट, फळवाटप अन् नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाने वाढदिवस ठरला चर्चेचा विषय..

राजु तुरानकर – संपादक.

वणी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातून प्रवास सुरू करून आपल्या मेहनत, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे शेतकरी, कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मात्र या वाढदिवसानिमित्त वणी शहरात एकच चर्चा रंगली होती — “एवढं लोकांचं प्रेम, एवढा जनसंपर्क आणि एवढं वैभव… नेमकं कमावलं तरी कसं?”

वेस्टर्न गोल्डमध्ये नोकरी करत असताना युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेल्या संजय खाडे यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मागील काही वर्षांत शेतकरी प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे तसेच गोरगरिबांना मदतीचा हात देत त्यांनी लोकांच्या मनात स्वतः बद्दल विश्वास निर्माण केला आहे. आणि त्यातूनच हे सारे वैभव प्राप्त झाले. ते केवळ त्यांच्या स्वभावामुळे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळच्या सत्रात शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाईफलाईन रक्तपेठी, नागपूर यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय खाडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

दुपारच्या सत्रात वणीजवळील पळसोनी येथील बाजीराव वृद्धाश्रमात कपडे, चप्पल तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

दरम्यान, संध्याकाळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनंजय खाडे संचालित “डीएसके कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स” या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय खाडे यांना शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि साधेपणामुळे अनेक युवक त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतात. संकटाच्या वेळी धावून जाणारा, लोकांच्या अडचणींना स्वतःची जबाबदारी मानणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज वणी विधानसभा क्षेत्रात त्यांची वाढती ताकद आणि जनसंपर्क हा चर्चेचा विषय ठरत आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संजय खाडे मित्रपरिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here