14 महिन्याच्या छकुलीचा सर्पदंशाने मृत्यू.

0
1633

 विषारी नागाने केला छकुलीला दंश, उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू.

टाकळी येथील घटना…

आनंद नक्षणे- मारेगाव.

तालुक्यातील टाकळी येथे घरी मायलेकी खाली झोपून असतांना विषारी सापाने अवघ्या 14 महिन्याच्या छकुलीला दंश केल्याने, उपचारासाठी नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्देवी घटना आज मध्यरात्री दोन वाजताचे दरम्यान घडली.

मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील निवासी आई पल्लवी व अवघ्या 14 महिण्याची आईच्या कुशीत निद्रावस्थेत असलेली काव्या वैभव खेवले ही खाली साखरझोपेत होती. अशातच मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास अंदाजे साडेतीन फुटाचा नाग त्यांच्या अंथरुणात शिरला व काव्याला अलगद पायाला दंश केला, दंश करताच काव्या रडायला लागली.आईला जाग येताच शेजारी विषारी साप निदर्शनास आला.आरडाओरड करताच शेजारील काहींनी तो साप पकडला.
काव्याला लागलीच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथे उपचारपद्धती नसल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवित असतांना काव्याचा सकाळी 6 वाजता दुर्देवी अंत झाला.

दरम्यान, वडील वैभव खेवले हे मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड म्हणून कर्तव्यावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here