लोकसभा निरीक्षक कृपाल तूमाने यांच्या मार्गदर्शनात BLA नियुक्तीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी!

0
199

कृपाल तुपाने यांच्या मार्गदर्शनाखाली वणीतील महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न.

BLA नियुक्तीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी !

दिपक कोकास व आशिष खुलसंगे विधानसभा निरीक्षक पदी.

राजु तुरणकर वणी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर BLA (Booth Level Agent) नियुक्ती व बूथ स्तरावरील संघटन बळकटीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार  चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निरीक्षक कृपाल तुपाने यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव, प्रविण शिंदे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे, उपजिल्हा प्रमुख उमेश वैरागडे, आकाश राठोड, तसेच दिपक कोकास, आशीष खुलसंगे, किरन नांदेकर, विक्रांत चचडा, शिवराज पेचे, अजिंक्य शेंडे, विशाल किन्हेकर, बाळू चेडे, चंद्रकांत घुगुल, पायल तोडसाम, उज्वला चंदनखेडे, भाग्यश्री वैद्य, ज्योती वाघाडे, सिमा आवारी, धीरज आवारी, अनिल उलमाले, प्रविण पिसे, संतोष लक्षेट्टीवार व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वणी विधानसभा निरीक्षक पदी दिपक कोकास व आशीष खुलसंगे यांची निवड करण्यात आली. व संपुर्ण विधानसभा क्षेत्रातील BLA बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले.

बैठकीत मार्गदर्शन करताना चंद्रपूर वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक कृपाल तुपाने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,पक्ष संघटनेत काम करताना गटबाजी व हेवेदावे अजिबात सहन केले जाणार नाहीत. संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.

तसेच लोकसभा नीरिक्षक कृपाल तुमाने यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सक्त निर्देश दिले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनीच पद भूषवावे. ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी पदाचा राजीनामा देऊन इतर कार्यकर्त्यांना संधी द्यावी. “शिस्तबद्ध संघटन आणि मजबूत बूथ हीच विजयाची गुरुकिल्ली”, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीनंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह व जोश संचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here