हारमोनी कंपनीच्या विरोधात भालार वासी आक्रमक.

0
430

भालर परिसरात नव्याने होऊ घातलेल्या हारमोनी कंपनीच्या विरोधात उपोषण…

सरपंच, उपसरपंच सह ग्रामस्थ आक्रमक….

लोकवाणी जागर वृतांक…

भालर पासून अवघ्या ८०० ते १००० मिटर अंतरावर  रॉकवेल मिनरला ही चुन्याची कंपनी सुरू आहे, याच कंपनीच्या प्रदूषणाने येथील नागरिक पहिलेच त्रस्त असताना, याच कंपनीची दुसरी शाखा हारमोनी मिनरल्स या नावाने नवीन कंपनी अवैध मार्गाने सुरू करण्यात येणार असल्याने भालर परिसरातील ग्रामस्थांना प्रदूषणामुळे आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो ही गंभीर बाब लक्षात घेता सरपंच, उपसरपंच सह नागरिकांनी उपसले उपोषणाचे हत्यार.

परिसरात सुरु असलेल्या में रॉकवेल मिनरल्स या कंपनीने,  प्रदूषण विभागाच्या नियमाना पायदळी तुड्यूल टायरची भुकटी जाळून होत असलेल्या भयंकर प्रदूषनामुळे गावकऱ्यांच्या व जनावराचे आरोग्य तसेच परिसरातील शेतातील पिके बाधीत होऊन शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतीसाठी पोषक अशा जमिनीवर अशा प्रकारचे व्यवसाय उभारण्यासाठी संबंधित विभाग व अधिकारी परवानग्या देवून शासन शेतकऱ्यावर अन्याय करीत आहे. पर्यावरणाला व सजीवाच्या जीविताला हानी पोचवणारे व्यवसाय MIDC वणी परिसरात उभारण्यात यावे याठीकणी होत असलेले काम बंद करावे यासाठी भालर वासी आक्रमक झाले आहे.

यापूर्वी बरेच वेळा में रॉकवेल या सध्या सुरू असलेल्या कंपनीच्या विरोधात अनेकदा गावातील लोकांनी आंदोलन करून उपोषण करून व ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित कंपनी बंद करण्यात यावी अशा प्रकारचा ठराव घेतला आहे. जुन्याच कंपनीच्या प्रदूषनामुळे गावकरी त्रस्त झालो आहे व नवीन कंपनी सुरू झाल्यास आमचे जीवन जगणे कठीण होणार आहे. सदर कंपनीस गावकऱ्यांनी विरोध दर्शवित व आक्षेप घेत उपोषणाला सुरुवात केली आहे.

गावकऱ्याचे मत विचारात न घेता म्हणजेच आमसभेचे मत विचारात न घेता आपल्या उपविभागीय कार्यालयाकडून में हारमोनी मिनरल्स या कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. उपविभागीय अधिकारी वणी यांच्या कडून परस्पर दिलेली परवानगी रद्द करून चालू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी घेवून उपोषण सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here