आंतरजिल्हा ड्रग्स तस्कराला अटक…..

0
151

आंतरजिल्हा ड्रग्स तस्कराला अटक…..

शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांची 9.82 लाखाचा ड्रग्स सह ईतर मुद्देमाल जप्त.

शिरपुर पोलीस स्टेशन ची कार्यवाही.

राजु तुरणकर – शिरपुर पोलीस स्टेशन नी ड्रग्स माफीया विरुध्द मोहीम हाती घेतली असतांना त्या दरम्यान काल दिनांक 11/2/2026 रोजी शिरपुर पोलीस स्टेशन ला माहीती मिळाली की, पुनवट येथे राहणारा व मागील 5 वर्षापासुन नागपुर येथे वास्तव्यास असलेला श्रेयश उर्फ गुड्डू पाटील नावाचा ईसम वणी, शिरपुर परीसरा मध्ये ड्रग्स ची विक्री करीत असतो तसेच तो आज सुध्दा वणी येथे ड्रग्स विक्री करीता जाणार आहे. अशी विश्वनीय गोपणीय खबर मिळाल्या वरुन मा. पोलीस अधिक्षक सा. याचे आदेशान्वये ड्रग्स तस्कराला पकडणे करीता पोलीस स्टेशन स्तरावर दोन पथके तयार करुन चारगांव ते वणी रोडवर नाकाबंदी लावुन व सापळा रचुन पोलीस पथके थांबलेले असतांना सायंकाळी 5/00 वा. चे सुमारास चारगांव कडुन वणी कडे जाणारी DATSUN GO+ कंपनीचे सिल्वर रंगाची वाहन क्रं. MH 32 AH 4126 येतांना दिसली सदर फोरव्हीलर वाहणाला शिताफीने थांबवुन आरोपी ला ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव श्रेयश उर्फ गुड्डु शंशीकांत पाटील वय 24 वर्षे रा. पुनवट ता. वणी जि. यवतमाळ ह.मु नागपुर असे सांगीतले. त्याची व त्याचे वाहणाची झडती घेतली असता, त्याचे ताब्यातुन 57.1 ग्रॉम MD (MEPHEDRONE) अंमली पदार्थ (सिन्धेटींक ड्रग्स) किंमत अंदाजे 560000/रू (पाच लाख साठ हजार रुपये) मिळुन आला. याशीवाय त्याचे गाडीतुन ड्रग्स मोजणे साठी वापरण्यात येणारे 3 डिजीटल वजन काटे किंमत अंदाजे 15000 रू व एक मोबाईल किंमत 70000/रू व ड्रग्स तस्करी करीता वापरण्यात येणारी फोरव्हीलर DATSUN GO+ कंपनीची किंमत 400000/रु (चार लाख रुपये) असा एकुण 982000/रू मुदयेमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा मध्ये पोलीस स्टेशन स्तरावर आज पावेतो केलेली हि सर्वात मोठी कार्यवाही आहे.

आरोपी श्रेयश उर्फ गुड्डु पाटील याला गुन्हात अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयाने चार दिवसाची P.C.R दिला आहे. या दरम्यान शिरपुर पोलीस स्टेशन ड्रग्स तस्करीचे मुळा पर्यत जावुन तपास करणार आहे. पोलीसा तर्फे आव्हान करण्यात येत आहे की कोणाकडे ड्रग्स विक्री कींवा सेवन करणारा व्यकती संदर्भात माहोती असल्यास पोलीस स्टेशन शिरपुर सोवत संपर्क साधावा त्याची ओळख गोपणीय ठेवण्यात येईल.

सदर कार्यवाही  उप.वि.पो.अ.वणी  सुरेश दळवे सा. पोलीस स्टेशन शिरपुर येथील ठाणेदार संतोष मनवर व पो. स्टॉफ पो.उप.नि धिरज गुल्हाणे, सुरज साबळे, ईक्बाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, किरण दासरवार, सुनील दुबे, यानी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here