चक्क शाळेत आले वाघोबा…..

0
2380

वाढोणा (बंदी) शाळेत विद्यार्थांना झाले वाघाचे दर्शन ..!

मुख्याध्यापक हेमराज रंगारी यांच्या समय सुचकतेने , टळला अनुचित प्रकार ..!

लोकंवाणी जागर

झरी तालुका अतिशय दुर्गम तालुका म्हणुन महाराष्ट्रात झरी तालुक्याला विशेष अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे साधन संपत्तीने नटलेल्या झरी तालुक्याच्या भागात विविध वनस्पती व वन संपत्ती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यामुळे याभागात मोठ्या प्रमाणात विविध प्राणी व वाघाचे दर्शन गावात राहणाऱ्या लोकांना घडत असते.

असाच काहीसा प्रकार , झरी तालुक्यातील वाढोणा( बंदी) या गावात घडला, गुरूवार दुपारच्या ३ वाजताच्या सुमारास, विद्यार्थांना मध्यांतराची (जेवनाची सुट्टी) सुट्टी झाली असतांना, जि.प. शाळा वाढोणा ( बंदी) येथील विद्यार्थी , शाळेच्या परिसरात भ्रमंती करीत असतांना, अचानक एका विद्यार्थीनींचा ओरडण्याचा आवाज शाळेतील शिक्षकांना आला. ही ओरड मुख्याध्यापक हेमराज रंगारी सर यांनी एकताच , रंगारी सरांनी वेळेचा पण विलंब न् लावता विद्यार्थीनीकडे धाव घेतली. तर बघतो काय..! शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या शेजारी दोन वाघाचे बछडे परिसरात भ्रमंती करतांना दिसुन आले. हिच बाब लक्षात घेता, मुख्याध्यापक हेमराज रंगारी यांनी समय सुचकता दाखवत, संपुर्ण विद्यार्थी व शिक्षकांना एकत्रित करुन शाळेच्या खोलीत बंद करुन गावाकडे धाव घेतली. व गावकऱ्यांना बोलावण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्याध्यापक रंगारी सर ईतक्या भयभीत परिस्थित का आवाज देत असेल ..! असा प्रश्न गावकऱ्यांना पडताच, “ धावा-धावा , वाघ आला “ ही ओरड पाहुन संपुर्ण गाव शाळेकडे धावला. त्यामुळे मुख्याध्यापक हेमराज रंगारी यांच्या समय सुचकतेने अनुचित प्रकार टळल्याने, गावात मुख्याध्यापक हेमराज रंगारी यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

वनविभागाचा या गंभीर विषयाकडे कानाडोळा –

जि.प.शाळा वाढोणा(बंदी) येथे वाघ दिसण्याची माहीती संपुर्ण गावकऱ्यांनी वनविभागाला कळवली, परंतु चिर निद्रेत असलेल्या वन विभागाला कुठलाही जाग आला नाही. त्यामुळे वनविभागावर संपुर्ण गावाचा मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. या अतिशय गंभीर बाबींकडे वन विभाग कुठली भुमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे राहील . या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल न् घेतल्यास समस्त गावकरी व विद्यार्थी जिल्हाअधिकारी यांच्या दालनात, आंदोलन करण्याच्या ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here