महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार संजय देरकरांचे अभिवादन…

0
140

महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार संजय देरकरांचे अभिवादन…

डॉ बाबासाहेब आंबेडकर बंद आसलेल्या वाचनालयाला दिली भेट…

राजु तुरणकर – संपादक.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त वणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  आमदार संजय देरकर यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

त्यानंतर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार संजय देरकर यांनी ब्लड कैम्प व ‘एक वही एक पेन’ अभियान येथे आयोजकांना भेट देऊन त्यांच्या सोबत संवाद साधला. त्यानंतर अनेक वर्षांपासून बंद असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे भेट देऊन वाचनालयाची पाहणी केली, व आंबेडकर अनुयायी व समाजबांधव यांचे उपस्थितीत वाचनालय सुरु करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत असलेले बबलू मेश्राम व प्रवीण खानझोडे यांनी केलेल्या प्रयत्नातून नगर परिषदेचे कर्मचारी धम्मा पाटिल यांनी वाचनालय चालू करण्यासंदर्भात आराखडा सादर केला व लवकरच वाचनालय सुरू होणार असल्याचे सांगीतले.

याप्रसंगी बोलताना आमदार संजय देरकर यांनी बंद असलेले वाचनालय मी स्वतः 1990 मध्ये नगर सेवक असताना चालू केल्याचे सांगीतले तर आज बंद असलेली वास्तू पुन्हा आमचे प्रयत्नातून डॉ बाबासाहेब महापरिनिर्वाण दिनी सुरु करण्यासंदर्भात मी स्वतः आमदार झाले नंतर मलाच योग आला हि माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगीतले.

बंद आसलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची पाहणी करताना आमदार संजय देरकर

यावेळी माजी.नगराध्यक्ष सुरेश रायपुरे, माजी.नगराध्यक्ष अर्चना रवींद्र कांबळे, संजय निखाडे, शरद ठाकरे, राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, डॉ जगन जुनगरी, सुभाष कालेकर, गुलाब आवारी, व समाजबांधव मोट्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here