आज वणीत शिवसैनिकांचा स्वप्नपूर्ती सोहळा.

0
461

आज वणीत शिवसैनिकांचा स्वप्नपूर्ती सोहळा.

खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांचा सपत्नीक सत्कार.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, महीला आघाडी आजी, माजी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने ” शिवसैनिकांचा स्वप्नपूर्ती सोहळा” आयोजीत करण्यात आला आहे.

खासदार मा. संजयभाऊ देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा व आमदार मा. संजयभाऊ देरकर वणी विधानसभा यांचा सपत्नीक सत्कार सोहळा या स्वप्नपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने कऱण्यात येणार आहे.

आज दिनांक १५ फेब्रुवारी 2025 ला एस बी लॉन वणी येथे सायंकाळी ४ वाजता हा स्वप्नपूर्तीचा सोहळा आयोजित केला आहे. नियोजित कार्यक्रमाच्या वेळेनुसारच माननीय खासदार श्री संजय भाऊ देशमुख आणि माननीय आमदार श्री संजय भाऊ देरकर हे ठरलेल्या वेळेतच कार्यक्रम स्थळी उपस्थित राहणार आहे. स्वप्नपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमा नंतर वणी मध्ये श्री संत रविदास महाराजांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने सदर मान्यवरांना नियोजित कार्यक्रम स्थळी पोहोचायचे असल्यामुळे सदर कार्यक्रम वेळेतच पूर्ण करण्यात येईल याची नोंद घ्यावी व सर्व शिवसैनिकांनी ठरलेल्या वेळेतच कार्यक्रम सही उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन आयोजक  वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना,शिव वाहतुक सेना, महीला आघाडी पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here