कर्मचाऱ्याची सूसाइड नोट लिहून आत्महत्या

0
848

केशव नागरी सहकारी पतसंस्था वणी च्या कर्मचाऱ्याची सुसाईड नोट लिहून करणवाडी येथे आत्महत्या.

वरिष्ठांवर सुसाईड नोट मध्ये आरोप करित विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने संचालक मंडळात माजली खळबळ. कलम 306/34 नुसार गुन्हा दाखल.

आनंद नक्षणे—मारेगाव.

केशव नागरी सहकारी पतसंस्था शाखा पांढरकवडा येथे कार्यरत व्यवस्थापकाने आपले राहते गावी करणवाडी येथे विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजताचे दरम्यान घडली.
आत्महत्या पूर्व लीहलेली सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केल्याने आत्महत्येचा उलगडा होणार आहे.
सुसाइड नोट मध्ये असलेल्या लिखाणामुळे व या दुर्देवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण रामचंद्र शिदूरकर असे विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविलेल्या इसमाचे नाव आहे. प्रारंभी वणी येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेत लिपिक पदावर कार्यरत असलेल्या लक्ष्मण ला त्यांच्या कार्यपद्धतीवर खूष होवून पांढरकवडा येथे बढती देत व्यवस्थापक पदावर कार्यरत पाठवले.मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचे डीमोशन करीत त्यांची बदली आर्णी येथे करण्यात आल्याने ते गेले नव्हते व कमालीचे अस्वस्थ होते व एक महिण्यागोदर त्यांनी विष पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती वडिलांनी दिली.

दरम्यान काल करणं वाडी गावला लागून असलेल्या विहिरीजवळ सायंकाळी 4 वाजता त्याची चप्पल व शर्ट आढळल्याने आत्महत्येचा कयास व्यक्त केल्या जात होता.तत्पूर्वी त्यांच्या घरातील तपासात मृतकाच्या वडिलांनी ‘सुसाईड नोट’ पोलिसांच्या स्वाधीन केली.यात नेमकं कुणावर दोषारोप आहेत ? यावरूनच आत्महत्येचा निकष आणि उलगडा होणार आहे.

मृतकाच्या पत्नीची प्रकृती खालावल्याने तिला मारेगाव रुग्णालयात हलविण्यात आले होते,मृतक लक्ष्मण यांच्या पश्चात वार्धक्यात असलेले आईवडील , पत्नी रुपाली व युवराज आणि ओम अशी कोवळी बालके आहे.या घटनेने पुरती शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here