उद्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सरकारच्या विरोधात वणी त “काळी दिवाळी” शिदोरी आंदोलन.
दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध..
शेतकऱ्याच्या आयुष्यात अंधार , अंधारात जाणार शेतकऱ्यांची दिवाळी, शासन मात्र गप्प गार ! आणि निवडणुकांच्या बैठकीत व्यस्त !!
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर – 9422673123
अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सरकारी मदतीकडे लागल्या होत्या.दिवाळी आधी मदत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शासनाकडून जीआर प्राप्त न झाल्याने मदत तर दूरच अद्याप याद्याच अपलोड झालेल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली असून, मदतीकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते. अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हताश झाला आहे. शासनाने मदतीसह कर्जमाफी देणे गरजेचे होते. मात्र हे सरकार शेतकरी विरोधी असून, अद्याप नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.
अतिवृष्टी,ओला दुष्काळ आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिले नाही, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद नाही, मात्र भाजपचे नेते मोठ्या दिमाखाने निवडणुकांचे फड रंगवताना दिसून येत आहे.

शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ₹50,000/- अनुदान द्या या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे दिवाळी ला “काळी दिवाळी” शिदोरी आंदोलन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांच्या प्रमुख उपस्थित उद्या दिनांक 21ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर शिवतीर्थ वणी येथे भाकरीची शिदोरी खावून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करणार आहे. तरी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी , मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी, आजी , माजी ,ज्येष्ठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.












