काँग्रेस पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दरम्यान उफाळली फुट…

0
1477

काँग्रेस पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दरम्यान उफाळली फुट, अंतर्गत गटबाजीला उधाण….
पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाला डावलून ‘वेगळी चुल’….

वणी:- काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले असून पक्षातील गटबाजी आता उघडपणे दिसून येत आहे. दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधीलच एक गट जनमानसात जनाधार असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून वेगळे राजकारण करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून दुसऱ्या गटाने वणी नगरपालिका लढविण्यासाठी आरक्षणा नुसार एस.टी महिला शोधली असून तिला नगराध्यक्ष म्हणून तिकीट देण्याची घोषणाबाजी सदर गटाने एका मीटिंगमध्ये केली आहेत.
अलीकडेच नुकतीच वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी विद्यमान खासदार व आमदार यांचे यांचे उपस्थितीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि इतर सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका एकत्र लढण्याची आवश्यकता असल्याबाबत उपस्थित सर्वानुमते चर्चा व्यक्त करण्यात आली मात्र खासदारांचा नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या अट्टाहासाने आघाडीत बिघाडी झाली आहे. हा निर्णय काँग्रेस पक्षासाठी घरघर निर्माण करणार आहे.

काँग्रेसमधीलच एका गटाने एका बैठकीपासून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर ‘वेगळी चुल’ मांडून वामनराव कासावार यांना बाजूला ठेवत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. मात्र काँग्रेसी जनता आजही वामनराव कासावार यांच्या पाठीशी दिसून येते.
स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते हा गट विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसोबत न जाता अपक्ष म्हणून मैदानात उतरला होता. त्यावेळी जनतेने दिलेला संदेश लक्षात न घेता,  आता त्याच गटाने पुन्हा आघाडीला वळसा घालून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करून फूट पाडण्याच्या उद्देशाने वणी नगरपालिकेच्या उमेदवारीचा मार्ग स्वीकारल्याने काँग्रेस पक्षाच्या संघटनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे माजी आमदार वामनराव कासावार हे महाविकास आघाडी सोबत होते व त्यांच्या पुढाकारात व सहकार्याने वणी विधानसभा क्षेत्रात संपन्न झालेल्या निवडणुकीत महाविकासआघाडी ही आघाडीवरच होती. लोकसभेत विजय आणि विधानसभेतही विजय मिळाला असे असतानांही काही लोक मात्र त्यांचे महत्व कमी करण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बघत असल्याने काँग्रेस पार्टीत चांगलीच चलबिचल उडाली असल्याचे बोलले जात आहे .
स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या गटबाजीबद्दल तीव्र नाराजी असून यामुळे भाजप व इतर विरोधी पक्षांच्या गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे वणी विधानसभा क्षेत्रात चित्र निर्माण झाले असून यामुळे काँग्रेस पक्षाला मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचे जनसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यात बोलले जात आहे…
पक्षातीलच अशी अंतर्गत धुसमूस कायम राहिली तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार अशी भीती व्यक्त होत असून काँग्रेसमध्ये उफाळलेली फुट माजी आमदार वामनराव कासावार यांना डावलून ‘वेगळी चुल’ मांडणाऱ्या गटामुळे गोंधळ निर्माण करणारी ठरणार आहेत काय…? या चिंतेत विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस प्रेमी दिसून येत आहेत…

या महविकास आघाडीतील दुफळीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला काही ऐक फरक पडणार नसल्याचे बोलले जात असून काँग्रेस मधील एका गटाच्या भूमिकेमुळे भाजप विरोधी संपूर्ण मतदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याचा निश्चितच फायदा होणार असल्याची जोरदार चर्चा जनमानसात सुरू झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here