सामजिक कार्यात सक्रिय युवकांनी बांधले शिवबंधन.
आमदार संजय देरकर यांचे नेतृत्वाखाली युवकांचे लोंढे शिवसेनेत.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
राकेश नगराळे लालगुडा तर ज्ञानेश्र्वर वाघडकर गोकुळ नगर या सामाजिक कार्यकर्त्यांनि शिवसेनेत आमदार संजय भाऊ देरकर यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी गणपत लेडांगे जिल्हा संघटक,सरपंच अजय कौरासे, डॉ जगन जुनगरी, भगवान मोहिते, मनीष बत्रा, राजू तुरणकर उपस्तित होते.
आमदार संजय देरकर यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक युवकांचे लोंढे दररोज आमदारांच्या निवासस्थानी येऊन शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रामध्ये युवकांची फार मोठ्या प्रमाणात फळी तयार झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढत आहे.












