BIG BREKING…. डॉ संचिता गेडाम (नगराळे) यांचा शिवसेनेत प्रवेश..

0
1359

BIG BREKING….

डॉ संचिता गेडाम (नगराळे)  यांचा शिवसेनेत प्रवेश..

वणी नगरपालिकेच्या निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदारी, आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात प्रवेश.

राजु तुरणकर – संपादक.- वणी नगर पालिकेच्या 2 डिसेंबर 25 ला  नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात डॉ संचीता गेडाम (नगराळे) यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय भाऊ देरकर यांचे मार्गदर्शनात प्रवेश केला.
विद्यमान आमदार संजय भाऊ देरकर हे स्वतः नगराध्यक्ष ते आमदार असा प्रदीर्घ अनुभव असलेले नेत्रुत्व ज्यांच्या मार्गदर्शनात वणी नगरपालिकेवर अनेक नेत्रुत्व नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. यांच्या पक्षात प्रवेश केल्याने डॉ संचिता नगराळे यांची निवडणुकीतील दावेदारी प्रबळ तर विजय निश्चित समजला जात आहे.

डॉ. संचीता गेडाम (नगराळे) या वणीमधील नांदेपेरा येथे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. त्या उच्च-गुणवत्तेची काळजी देण्यासाठी समर्पित आहेत आणि सर्व रुग्णांना आस्थेने विचारपूस करुन सेवा देतात. त्यामुळे त्यांच्याविषयी महिला वर्गात आदर आहे, त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
शिवसेनेचे माजी पंचायत समितीचे सदस्य दयालाल अरके गुरुजी(शिरपूर) यांचा सुकन्या आहेत. त्यांच्या प्रवेश्याने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहेत.

हा पक्षप्रवेश आमदार संजय भाऊ देरकर यांच्या निवास स्थानी छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे , जिल्हा महिला संघटिका योगिताताई मोहाड , किरणताई देरकर , गीताताई उपरे, दिमनताई टोंगे, पुष्पाताई भोगेकर, दिपक कोकास, शरद ठाकरे, सुधीर थेरे, गणपत लेडांगे, अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हाप्रमुख, संतोष कुचनकर तालुका प्रमुख, प्रकाश कराड, विनोद ढुमणे, राजु तुरणकर, मनिष बतरा, दिलीप काकडे, प्रेमानंद धानोरकर,आयुष ठाकरे, मनोज ढेंगळे, डॉ बोबडे, लुकेश्र्वर बोबडे, अजय चन्ने, मोहंमद अल्ताफ, मोरेश्वर उज्वलकर, बबन केळकर, मोहंमद अन्सार, पंढरी राजूरकर, गोपी पुरबार, राजु पाटील, राहुल कोलते, हर्षित जूनेजा व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here