डॉ जगन जुनगरी यांना पितृशोक.
परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व डॉ काशिनाथ जुनगरी काळाच्या पडद्याआड.
राजु तुरानकर – संपादक लोकवाणी जागर.
डॉ. जगन जुनगरी यांचे वडील डॉ. काशिनाथ जीं जुनगरी यांचे दिर्घ आजाराने आज सकाळी वणी( चिखलगाव) येथिल राहते घरी निधन झाले आहे.
डॉ काशिनाथ जुनगरी हे वैद्यकीय क्षेत्रात एक सामाजिक भान जोपासत आयुष्य जगले.व्यवसाय करतानाच सामाजिक जबाबदारी पार पाडणे हा त्यांचा स्वभाव असल्याने परीसरात ते प्रसिद्ध होते. ते सदगुरू जगन्नाथ महाराजांचे भक्त होते.
त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव वांजरी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या मागे दोन मुले , एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.












