पुरुषोत्तम आवारी यांची बँक प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड.
सहकार क्षेत्रातील मोठी घडामोड.
राजु तुरानकर – संपादक
झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या सभेमध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा विषय घेण्यात आला .त्यात सर्वानुमते पुरुषोत्तम केशव आवारी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी व संचालक वसंत जिनिंग शेतकरी सहकारी संस्था वणी यांची बँक प्रतिनिधी म्हणून एकमताने नियुक्ती करण्यात आली .त्यासाठी सिंधी वाढोना, डोंगरगाव, पिल्की वाढोना व पठारपूर या चारही गावच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केलेव काँगेस पक्षा मध्ये या निवडीने उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.











