नामदेवराव शेलवडे यांना चिखलगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली.

0
193

नामदेवराव शेलवडे यांना चिखलगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली.

साई दर्पण ग्रुप, आदर्श ज्येष्ठ मंडळ समिती, चिखलगाव वतीने श्रध्दांजली.

राजू तुरानकर – संपादक

चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ, गणेशपूर व आदर्श ज्येष्ठ मंडळाचे संचालक, तसेच श्री. बाजीराव महाराज वृद्धाश्रम, चिखलगाव येथे निस्वार्थ सेवा देणारे संचालक, माजी स्वातंत्र्यसैनिक व नगर सेवा समितीचे सक्रिय सदस्य श्री. नामदेवराव जी फकरूजी शेलवडे यांचे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

श्री. शेलवडे हे स्वच्छता, वृक्षारोपण व सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत होते. गुरुवर्य कॉलनी, वणी येथील प्रेमळ व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. समाजसेवेसाठी त्यांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने योगदान दिले.

आज सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान, साधनकरवाडी, चिखलगाव येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी त्यांना सन्मानपूर्वक सलामी दिली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास साई दर्पण ग्रुप, आदर्श ज्येष्ठ मंडळ समिती, चिखलगाव, तसेच मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here