महिलांनी भयमुक्त जीवनासाठी महानायिकांचे विचार आत्मसात करावेत- वृषाली खानझोडे.

0
181

महिलांनी भयमुक्त जीवनासाठी महानायिकांचे विचार आत्मसात करावेत- वृषाली खानझोडे.

राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

राजू तुरणकर-  हटवांजरी मारेगाव .

समाजातील प्रत्येक महिलांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वैचारिक वारसा डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन उंचावावे. महिलांनी स्वाभिमान, आत्मविश्वास व निर्भयतेने जीवन जगण्यासाठी महानायिकांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वृषालीताई खानझोडे, माजी उपसभापती, वणी यांनी केले.
तालुक्यातील हटवांजरी येथे राजमाता जिजाऊ जयंती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. हा संयुक्त जयंती उत्सव महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मारेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र, मारेगाव यांच्या पुढाकाराने गुरुवारी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्विनी ताई डेंगळे होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये ग्रामपंचायत सरपंच प्रियाताई कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य. शारदाताई कालेकार, गावचे पोलीस पाटील अनिरुद्ध माथनकर, मानकर सर, जिल्हा परिषद मुख्याध्यापक ताटेवार सर, लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे, तसेच संतोष आत्राम, स्मिता ठाकरे, विशाखा वैरागडे, संगीता डाहुले, पाकमोडे मॅडम, कार्यालयीन लेखापाल सयोगिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
या जयंती कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. सोनू माथनकर, मनीषा लांडगे, रंजना ठक, मायाताई हेपट, संगीताताई ठक, भावना देशमुख, नंदा कळसकर, करिष्मा धोबे, शोभा धोबे, सारिका दानव, चंदाताई घोडाम यांच्यासह गावातील विविध महिला बचत गटांच्या शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाने महिलांमध्ये सामाजिक जाणीव, आत्मभान व प्रेरणा निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here