युवासेनेचे आज धरणे आंदोलन

0
188

युवासेनेचे आज धरणे आंदोलन.

गुटखा तस्करीला अभय देणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात असलेल्या धरणे आंदोलनात सामील होण्याचे अजिंक्य शेंडे यांचे आवाहन.

राजू तुरणकर – संपादक 

महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा वणी परिसरात सऱ्हास सूरू असताना पोलीसांनी नेहमीप्रमाणे बनावट व अर्धवट कारवाईचे  सोंग करुन मुख्य आरोपींना सोडून प्रकरण सेटिंग केल्याने युवासेना आक्रमक भूमिका घेत आज 26 जानेवारी रोजी वणी उपविभागीय कार्यालय समोर धरणे आंदोलन करून वणी पोलिसांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे.

एकीकडे भाजप मंत्र्याला शेतकरी हितासाठी काळे झेंडे दाखविले म्हणून शिवसैनिकांवर गंभीर गुन्हे दाखल करुन जेलवारी पाठवणारे तेच पोलीस अधिकारी आज मुंग गिळून गप्प का?
कायदा सर्वांसाठी समान असतो की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि तस्करांसाठी मोकळा?
लोकशाहीत आंदोलन हा गुन्हा ठरतो,पण समाज उद्ध्वस्त करणारी गुटखा तस्करी चालते का?
पोलीस प्रशासनाचा हा निवडक आवेश नेमका कुणाच्या इशाऱ्यावर?
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी,
लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्यांनाच आरोपी बनवण्याचा हा कळस नाही का?

आता शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, आणि अन्यायाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी उद्या 26 जानेवारी 2026 गुटखा तस्करीला अभय देणाऱ्या वणी पोलिसांच्या विरोधात मा.आमदार संजय देरकर जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे हे धरणे आंदोलन करणार आहेत तरी वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व निष्ठावंत शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here