शिवसैनिकांची रायगड वारी, वणी वरुन रवाना.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी शिवसैनिक रायगड किल्याकडे रवाना.
राजू तुरणकर – संपादक.
पवित्र गडावर पवित्र कार्य करण्याचा निर्धार मनाशी बाळगून भगवा झेंडा हातात घेत शिवसैनिक रायगड वारीला वणी वरुन आज रवाना झाले आहेत. अजिंक्य शेंडे व राजु तुरणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ्ता अभियान वारीला समाज सेवक छोटू राऊत यांचे हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भगवी झंडी दाखवून वारी रायगडला निघाली. यावेळी अजय धोबे, संदीप गोहोकर, शैलेश ढोके, कैलाश पचारे, अजय कौरासे, प्रविण पेचे, जितू शिरभाते, आशिष रींगोले, महादेव दोडके यांनी वारीला शुभेच्या दील्या.
जयंती निमित्ताने परिसर स्वच्छ करून छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या चरणी अभिवादन करण्यासाठी ही वारी काढण्यात आली आहे.
कृतीतून महापुरुषांचे विचार प्रत्यक्षात जगताना शिवसैनिकांना पाहून वणीकर जनतेच्या हृदयातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. ही केवळ स्वच्छता मोहीम नसून, ही संस्कारांची आणि स्वाभिमानाची परंपरा जपण्याची चळवळ आहे.
वारीला अजिंक्य शेंडे , राजू तुरणकर, बंडु चांदेकर, नंदू ढूमने , दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे,मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले,मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय,श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया,सुयेश नगराळे ,संजोग झाडे, तुषार दुरुटकर हे महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी शिवसैनिक आज पवित्र रायगड किल्ला कडे रवाना झाले आहेत.











