वणीतील श्री छत्रपती शाहू महाराज आयटीआयमध्ये प्रवेश सुरू.

0
97

ADMISHION OPEN……वणीतील श्री छत्रपती शाहू महाराज आयटीआयमध्ये प्रवेश सुरू.

सुवर्ण संधी….. विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिशियन व मेकॅनिक डिझेल ट्रेड उपलब्ध.

राजु तुरानकर वणी : येथील पी-१, एमआयडीसी एरिया परिसरातील श्री छत्रपती शाहू महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेमार्फत ८० टक्के शासकीय कोटा व २० टक्के व्यवस्थापन कोट्यांतर्गत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

संस्थेमध्ये विजतंत्री (Electrician) तसेच मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel) हे अभ्यासक्रम उपलब्ध असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये म्हणून अनुभवी शिक्षकवर्ग, प्रशस्त कार्यशाळा, अद्ययावत कॉम्प्युटर लॅब, उत्कृष्ट निकालांची परंपरा, शिष्यवृत्ती सुविधा तसेच रोजगार व अप्रेंटिसशिपसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाते.

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 9422165394 / 9158503503 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here