गोल्ड मेडलिस्ट सात वर्षाची मनस्वी बोटोणी ते वणी करणार रोलर स्केटिंग. युवासेनेच्या वतीने होणार स्वागत.
23 जानेवारी ला 30 किलोमीटरचे अंतर पार करून , छत्रपति शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार समारोप.
राजु तुरणकर – संपादक
मारेगाव तालुक्यातील (चिं) बोटोणी येथील सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथे राहत असून मनस्वी ने रोलर स्केटिंग मध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नांवावर केले आहे.ती जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट २०२१ , नॅशनल स्केटिंग चॅम्पियन २०२३ आणि नुकतेच सुवर्ण पदकाचे शतक पूर्ण केले आहे.
मनस्वी नेहमीच एका नवीन विक्रमाला गवसणी घालते २६ जानेवारी २०२४ रोजी मनस्वीने बोटोणी ते मारेगाव बेटी बचाओ – बेटी पढाओ करीता सलग १२ किमी स्केटिंग केले होते.आपल्या भागातील युवकांना आपल्या पासून प्रेरणा मिळावी व त्यांचा जास्तीत जास्त कल खेळाकडे व्हावा याकरिता येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी चिं बोटोणी ते वणी ३० किमी चे अंतर स्केटिंग द्वारे पूर्ण करून ३० किमी स्केट फॉर युवा ह्या प्रेरणात्मक संदेश मनस्वी देणार आहे.
स्केटिंग रॅलीची सुरुवात बोटोणी येथून २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता होणार असून मनसे नेते मा.श्री. राजुभाऊ उंबरकर यांच्या सह प्रमुख उपस्तीथी मध्ये वणी विधानसभा आमदार श्री.संजयभाऊ दरेकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,भाजपा नेते विजुभाऊ चोरडिया, कृउबा समिती मारेगाव सभापती गौरीशंकर खुराणा,अध्यक्ष वसंत जिनींग वणी आशिष कुळसंगे , संजय खाडे संचालक महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ मुंबई,तहसिलदार उत्तम निलावाड, ठाणेदार संजय सोळंके, आणि लायन्स स्कुल वणी अध्यक्ष बलदेव खुंगर तर पाहुणे बोटोणी येथील सरपंच सौ.सुनीताताई जुमनाके,माजी प.स.सदस्या सुनीताताई लालसरे आणि चि बोटोणी येथील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व निमंत्रित सर्व पत्रकार बंधु व इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब मारेगाव यांची उपस्थिती राहील, स्केटिंग रॅली दरम्यान मनस्वीचे प्रशिक्षक मा विजय मलजी सर हे मनस्वीला विशेष मार्गदर्शन करणार आहे.
स्केटिंग रॅलीचा समारोप शिवाजी पुतळा वणी येथे सकाळी अंदाजे १०.३० ते ११ वाजता दरम्यान होईल.हि स्केटिंग रॅली यशस्वी होण्यासाठी बजरंग दल ,गुरुदेव सेवा मंडळ ,छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान,तथागत युवा मंडळ ,माँ शेरा वाली क्रिकेट क्लब बोटोणी व बोटोणी येथील समस्त ग्रामस्थ याचे विशेष सहकार्य लाभणार आहे












