निवडणूका आल्या की कावळ्यांची काव काव सुरू…

0
474

निवडणूका आल्या की कावळ्यांची काव काव सुरू…

शहरातील विकास बेगडी स्वरूपाचा ठरला काय, सर्वसामान्य जनतेला पडलेले प्रश्न…

राजु तुरणकर – संपादक.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. यात आता सर्व पक्षात आता राहिले ते मावळे उडाले ते कावळे अशी अवस्था असून सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या कडे असे उमेदवारीसाठी काव काव करीत फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.

निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. स्थानिक पातळीवरही आपलेच नियंत्रण राहावे, यासाठी राज्य आणि केंद्र पात‌ळीवरुन हस्तक्षेप होत असतात.

या निवडणुका स्थानिक प्रश्नांवर व्हाव्यात अशी अपेक्षा असते. पण तसे होणे राजकीयदृष्ट्या सोईचे नसते. स्थानिक प्रश्न, उदा. कचरामुक्ती, स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा, दर्जेदार रस्ते, प्रदूषण नियंत्रण, कार्यक्षम प्रशासन, आवश्यक नागरी सुविधांची उपलब्धता यावर निवडणूका व्हायला हव्यात. या मुद्द्यांवर नागरिक समाधानी आहेत का, याचे सर्वेक्षण केले तर वणी शहरात एकही नागरीक अनुकूल मत व्यक्त करण्याची दुरापास्त आहे .याउपर राज्य सरकार कसे आहे, वरिष्ठ नेते कसे आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत या भोवती निवडणूक फिरण्याची शक्यता अधिक. ते होऊ देणे प्रमुख राजकीय पक्षांनाही सोईचे असते. मात्र जनता “खाओ पिओ दबाके, वोट मारो दीलसे”  वर आली आहे.

शहरातील विकास हा बेगडी स्वरूपाचा ठरला काय ? जनसामान्य माणसाला पडलेली प्रश्न..

निवडणूकीत शहरात करोडो रुपये खर्च करून बांधलेले रस्ते खरोखर उत्कृष्ट दर्जाची आहेत काय, 17 करोड रुपये खर्च करून वर्धा नदीवरून पाणी आणून मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील सुद्धा वणी कर जनतेला पाणीपुरवठा तिन दिवसा आड होतो तो सुद्धा अशुद्ध. वणी कर जनतेच्या करातून बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज उधाण मध्ये नागरिकांकडून प्रवेष फी आकारली जाते मग बगीचा कुणासाठी, बॅडमिंटन कोर्ट बांधले गेले त्यांच्या उपयोग विशिष्ठ लोकांच्या साठी, ठेकेदार खेळणाऱ्या कडून प्रतिमहा वसुली करतो, गरीब खेळाडूंना प्रवेश नाही, मग ही व्यवस्था कुणासाठी ऊभी केली गेली. रस्त्याच्या मधोमध जी झाडे लावली कारोडोचा वर आकडा आहे,  मी करोडचा म्हणत हि झाडे वणी कर जनतेला वाकुल्या दाखवत आहे, यात कोण मोठ झाल आणि कुणी केल.भूमी अभिलेख विभागाच्या दुर्लक्षामुळे नगर परिषद घरकूल लाभार्थ्यांना लाभ देण्यास असमर्थ ठरत आहे, असा आरोप करत माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्यासह 21 जण तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. तो केवळ दिखावा ठरला, ना पट्टे ना घरकूल.., करोडो रुपये खर्च करून बांधलेले सांस्कृतिक भवन धूळखात पडले आहेत, असी अनेक निरुतरित प्रश्न वणी कर जनतेला पडली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. हया सर्व प्रकारच्या चर्चेतून पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगाला चमकण्यासाठी, जो बेगडी कागद लावला जातो त्याची चमक जसी क्षणभर असते, अश्या स्वरूपाचा विकास वणी कर जनतेने अनुभवला आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा वणी कर सुज्ञ नागरिक कोणाच्या बाजूने आहे , हे आता सिद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here