Home Breaking News मनी प्लांट विसरा! ‘क्रासुला प्लांट’ ठरतोय धन आकर्षित करणारा खास पौधा.

मनी प्लांट विसरा! ‘क्रासुला प्लांट’ ठरतोय धन आकर्षित करणारा खास पौधा.

0
179

मनी प्लांट विसरा! ‘क्रासुला प्लांट’ ठरतोय धन आकर्षित करणारा खास पौधा.

कुबेराक्षी,  झाड एक फायदे अनेक… सकारात्मक ऊर्जा, गृह शांती वास्तू दोष निवारण.

राजु तुरणकर – संपादक.

घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक जण वास्तुशास्त्राचे उपाय अवलंबतात. सध्या (कुबेराक्षी) क्रसुला प्लांट विशेष चर्चेत असून त्याला ‘मनी ट्री’ किंवा ‘सक्सेस प्लांट’ असेही म्हटले जाते.

कुबेर देव हे धन, संपत्ती आणि समृद्धी देणारे दैवत मानले जातात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट व्हावी या श्रद्धेतून या विशेष वनस्पतीला “कुबेराक्षी झाड” असे नाव दिले गेले आहे.

क्रॅसुला ओवाटा या वनस्पतीची पाने जाड, चमकदार आणि मऊ असतात. वास्तुशास्त्रानुसार हा पौधा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून धन आकर्षित करण्यास मदत करतो. असे मानले जाते की हा पौधा चुंबकाप्रमाणे पैसा आणि समृद्धी घराकडे खेचतो.

योग्य दिशा कोणती? घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्याने त्या दिशेत क्रासुला ठेवल्यास आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलू शकतात.ऑफिसमध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास मानसिक एकाग्रता वाढून व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.

काळजी कशी घ्यावी?  पानांवर धूळ साचू देऊ नका. अंधाऱ्या जागी किंवा बाथरूममध्ये ठेवू नका. नियमित स्वच्छता आणि योग्य देखभाल महत्त्वाची आहे.

योग्य जागा आणि योग्य निगा राखल्यास क्रासुला घरात सकारात्मक वातावरण आणि भरभराट घेऊन येतो, अशी श्रद्धा आहे.

डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतांवर आधारित असून अंधश्रद्धेला दुजोरा देण्याचा उद्देश नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!