मुकुटबन येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची ग्रामवसियांची आग्रही मागणी

0
147

मुकूटबन येथे सर्वच रेल्वे गाड्यांना थांबवा – सरपंच 

सरपंचा सह ग्रामस्थांची आग्रही मागणी.

राजू तुरानकर — संपादक लोकवाणी जागर

मुकूटबन : नुकतेच मुकूटबन येथे रेल्वे स्टेशनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रम करीता आलेले रेल्वेचे प्रमुख अधिकारी मोहन चौधरी,नरेश लेकरिया यांना मुकूटबन ग्रामपंचायत व गावकरी च्या वतीने निवेदन देण्यात आले.
मुकूटबन नगरीतील सरपंच मीना जगदीश आरमुरवार ग्रा.म सदस्य शंकर लाकडे, संजय परचाके, अर्चना चिंतावार तंटामुक्ती अध्यक्ष बाळूभाऊ बरशेटीवार, रमेश उद्दकवार, अरुण चिंतावार, गणेश चिंतावार, सामजिक कार्यकर्ते सुरेश मानकर , चक्रधर तिर्थगिरीकर व ग्रामस्थ च्या वतीने निवेदन देण्यात आले.

मुकूटबन वरून जाणाऱ्या प्रत्येक साप्ताहिक एक्स्प्रेस संत्रा – घाची दीक्षाभूमी एक्स्प्रेस पूर्णा पटना तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस चा थांबा मुकूटबनला देण्यात यावा तसेच रेल्वे तिकीट आरक्षण मुकूटबन रेल्वे स्टेशनला सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

 

 मुकूटबन येथे सर्व रेल्वे थांबा देण्यासाठी नागपूरला रेल्वे विभागात निवेदन देण्यात आले होते झरी तालुक्यातील सर्वात मोठे बजारपेठ मुकूटबन हे गाव आहे व या गावाला जोडलेले अनेक लहान गावे आहेत तेव्हा सर्व रेल्वे थांबा मुकुटबन द्यावा असे सरपंच यांच्या भाषणातून मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here