सुबोध आवारी यांची दैवी उंचीच्या प्रवासा कडून , मर्यादांच्या पलीकडील वाढदिवसाची मोहिम.
सुबोध आवारी यांनी पर्वत रांगा चडून साजरा केला एक आगळा वेगळा वाढदिवस… तो चित्त थरारक अनुभव.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर – 9422673123
आज तरुणाई वाढदिवस म्हटलं की झगमग पार्टी, केक कापणे, रस्त्यांवर फटाके फोडून उत्सव साजरा करतात, पण त्याही पलीकडे जाऊन आपला वाढदिवस आपणच एका दैवी उंचीच्या पलीकडे जाऊन, तो उत्तराखंडातील पांगुरचाला पर्वत रांगा चढून न की केक, मेणबत्त्या आणि शुभेच्छा यापलीकडे जाऊन, धैर्य आणि हिम वाऱ्यांसोबत साजरा करायचा निर्धार करून साजरा करणाऱ्या सुबोध च्या या धेर्याला व हिंमतीला लोकवाणी जागरण कडून मानाचा मुजरा.
हिमपर्वत चढताना आलेली आवाहने..
हिमालयात हिवाळ्याने आपले पांढरे वस्त्र पसरवले असते उत्तराखंडातील गढवाल प्रदेशातील खडतर भूभाग, बर्फाच्या चादरीखाली लपलेले, आव्हान देत असतात. अश्यात सहनशक्ती आणि आत्मविश्वास तपासायचा — दयाळीशेरा बुग्याल (१२,२७० फूट) आणि पांगरचुला शिखर (१५,०६९ फूट) या दोन्ही ठिकाणी चढाई करायची तर फार मोठे आवाहन असत ही दोन्ही ठिकाणे चमोली जिल्ह्यातील नंदा देवी राष्ट्रीय उद्यानात वसलेली आहेत, आणि हे आवाहन सहज पेलत सुबोध आवारी यांनी मोहीम फत्ते केली आहे.
सुरुवात – १२ ऑक्टोबर २०२५
सुबोध आवारी हे दिल्लीहून एका गारठलेल्या रात्रीला देहरादून मार्गे जोशीमठ येथे त्यांचे मार्गदर्शक हेमंत फर्सवाण यांच्या कर्चो गावातील घरी मुक्काम केला.त्यांचे दोन भाऊ — पवन आणि प्रियंशू हे सुध्दा त्यांच्या छोट्याशा पण निर्धाराने भरलेल्या पथकात सामील झाले, आणि चर्चेला सुरुवात झाली अंदाज केला की चढाई आणि उतरणीचा प्रवास मिळून सुमारे सहा दिवस लागतील.
पहिला दिवस – जंगलात प्रवेश, चीतथराक अनुभव.
१३ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्चो गावातून निघाल्यावर चढावाचा मार्ग उंच झाडांच्या गर्द वनातून वळत-वळत जात होता. अखेर ते सर्व धुरकुंड येथे पोहोचलो — ओढ्याच्या किनारी असलेले एक शांत, रम्य ठिकाण, तेथे तंबू टाकला आणि विश्रांती घेतली. संध्याकाळी सूर्य रांगांच्या मागे मावळताच तापमान झपाट्याने खाली उतरले — साधारण ५–६°C. उब मिळावी म्हणून स्वेटर, मफलर आणि वाऱ्याची जाकीट घातली.
जेवणाआधी हात धुण्यासाठी जेव्हा बर्फासारख्या थंड पाण्यात हात बुडवले, तेव्हा बोटे लगेच सुन्न झाली. त्या क्षणी समजले — हिमालय म्हणजे केवळ डोंगर नाही, तो अनुभव आहे.
रात्र लांब होती, गारठवणारी आणि नम्र करणारी — कठीण जमिनीवर, कॅनव्हासच्या तंबूत, स्लीपिंग बॅगमध्ये दडपून काढलेली.
दुसरा दिवस – देवभूमीची दारे
दयाळीशेरा बुग्यालकडे जाणारा मार्ग अधिक खडतर आणि थकवणारा होता. सूर्यप्रकाश आणि सावलीच्या पट्ट्यांतून जाताना कधी थंडावा, तर कधी अनपेक्षित उब – प्रत्येक पाऊल शरीराला आव्हान देत होते.
संध्याकाळी, एका अप्रतिम अल्पाइन माळरानाच्या टोकावर उभा
दयाळीशेरा बुग्याल, एका स्थानिक देवतेच्या नावावरून ओळखले जाणारे.
तेथे फिरताना हेमंतने एका ओल्या, दलदलीसारख्या ठिकाणी बोट दाखवले —जिथे दरवर्षी नैसर्गिकरीत्या धान्य उगवते.
“कोणी पेरणी करत नाही, नांगरतही नाही,” तो शांतपणे म्हणाला.
“ही देवाची शेती आहे — ज्याने ती कापायचा प्रयत्न केला, त्याला संकट भोगावे लागले.”
१२,००० फूट उंचीवर, जिथे वर्षभर बर्फाचं साम्राज्य असतं, तेव्हा मला उमगलं — उत्तराखंडला “देवभूमी” का म्हणतात.
त्या संध्याकाळी सुबोधने हिमस्नान करण्याचे धाडस केले — शरीर थरथर कापू लागले, पण थोड्या वेळाने आतून उष्णता निर्माण झाली.
लहानशा आगेपाशी आम्ही जेवलो आणि लगेच स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो — थोडीशी उब जपण्यासाठी.
तिसरा दिवस – शांततेचा शिखर
१५ ऑक्टोबर २०२५ च्या पहाटे जाग आली — अंग बधिर झालं होतं, श्वासातून धूर निघत होता. बाहेर आलो तर गवतावर दव नाही, तर हिमकणांनी बनलेले बर्फाचे आवरण दिसले — झाडांची आणि झुडपांची श्वास स्वतःच गोठली होती.त्या सर्वांच्या मिशीसुद्धा हिमवर्षावाने पांढऱ्या झाली होत्या !
भीती ऐवजी आता आदर वाटू लागला. हेमंतने आग पेटवली आणि आणि सर्व चैतन्याने उठलो.
आता चढाई होती — पांगरचुला शिखरावर.
रानटी रुद्राक्ष आणि बुरांशाच्या जंगलातून वाट काढत आम्ही बर्फाच्या रेषेपर्यंत पोहोचलो. सूर्यकिरणांनी बर्फ मऊ झाल्यामुळे प्रत्येक पाऊल बुडू लागले.
बुटांवरील स्पाइक आणि गेटर्स असूनही पाय स्थिर राहत नव्हते.
हवा विरळ झाल्यामुळे प्रत्येक श्वास लढाईसारखा वाटत होता.
काही तासांच्या संघर्षानंतर सर्व एका अरुंद कड्यावर —
जवळपास दीड फूट रुंद, आणि दोन्ही बाजूला दोन हजार फूट खोल दऱ्या. शेवटी सुबोध उभा होता— १५,०६९ फूट उंचीवरील पांगरचुला शिखरावर.
समोर पसरलेले हिमालय — नंदा देवी, द्रोणागिरी, हत्ती-घोडा आणि असंख्य शिखरे.
त्या क्षणी सुबोध हा स्वतःला लहान पण अमर्याद असल्याची अनुभूती घेत होता.
नंदा देवीकडे पाहत असताना जाणवलं — ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे.
आणि त्याच्या मनात एक ठिणगी पेटली होती — एक दिवस तिच्यावरही चढायचं.

पण हवामान झपाट्याने बदललं. ढग जमले, आणि काही वेळात त्यांच्या आत हरवून गेलो.
धोका ओळखून उतरण्यास सुरुवात केली — बर्फावर घसरत, अर्धं चालत, अर्धं खेळत — थकलो, पण जिवंतपणाचा अर्थ जाणवला.
वादळाची रात्र आणि अस्वलाचा सामना
सर्व परतीच्या प्रवासात परत दयाळीशेरा बुग्याल छावणीत पोहचले तोपर्यंत बर्फवृष्टी सुरू झाली होती. रात्री वारे गर्जत होते, तंबू हलत होता — एकमेव आश्रयस्थान.
तो चित्त थरारक अनुभव
पहाट होताच कर्चो गावाकडे उतरण्यास निघाले.
खडतर उतारामुळे गुडघे दुखू लागले, म्हणून एका ओढ्याजवळ तंबू टाकला.जेवण चालू असताना झाडांखाली काहीतरी हललं —
एक मोठं अस्वल! क्षणभर सर्वांचे हृदय थांबलं.
ताबडतोब सर्व तंबू भोवती लहान लहान आगेपाशी पेटवल्या,
आणि टॉर्चचा तेजस्वी प्रकाश टाकत मोठ्याने ओरडलो.
अस्वल पळून गेलं, पण भीती पोटी झोप मात्र आली नाही.
पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत जीवात जीव आला.
उबेकडे परत
संध्याकाळी सर्व कर्चो गावात परतले मार्गदर्शक प्रशिक्षक हेमंत च्या कुटुंबाने प्रेमाने सर्वांचं स्वागत केले.
त्यांची आजी प्राचीन डोंगरकथा सांगत होती, आणि वडील आग्रहाने म्हणाले — “अजून खा, अजून थोडं!” त्यांच्या गर्ह्वाली आदरातिथ्याने मन भारावून गेलं.
त्या रात्री, बिछान्यात झोपताना जाणवलं — प्रवास पूर्ण झाला.
मन- शिखरा पलीकडच सत्य
या मोहिमेच्या अनुभवातून मन बदलून टाकल्याचे सूबोधचे शब्द
निसर्गाची खरी शक्ती, स्वतःची मर्यादा, आणि डोंगरातील साध्या लोकांच्या आयुष्यातील कृपा मला अनुभवायला मिळाली.
लोक वारंवार विचारतात —“असं का धोकादायक चढायला जातोस? काही मिळतं का त्यातून?” पण त्यांना समजत नाही —
प्राचीन काळी लोक शिखरावर पोहोचण्यासाठी नव्हे, तर प्रवासातील प्रत्येक पावलात देवत्व शोधण्यासाठी चढत.
देव शिखरावर थांबलेला नसतो — तो प्रवासात असतो.
काळानुसार आपण ती सत्यता विसरलो. मंदिरे पर्यटक स्थळे बनली, आणि पवित्र चढाई शॉर्टकट झाली.पण आमच्या सारख्यांसाठी, डोंगर अजूनही हाक देतात —
देवत्व पुन्हा अनुभवण्यासाठी, मंदिरात नव्हे, तर श्वास आणि हिमाच्या शांततेत.

आणि जे अजूनही विचारतात “का?” —
त्यांना काही उत्तर नाही.
कारण डोंगर समजावून सांगायचे नसतात — ते अनुभवायचे असतात.











