ग्रामपंचायत सरपंचाची ठेकेदाराला बिल काढण्यासाठी पैशांची मागणी, अन् लाच लुचपत विभागाची धाड.
महिला सरपंच गोत्यात….. कारवाईने खळबळ.
लोकवाणी जागर
मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथील महिला सरपंच हिने संरक्षण भिंतीच्या देयके काढूण देण्यासाठी पैशांची मागणी केल्याने त्रस्त ठेकेदाराने केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ फुलू कुमरे असे आरोपी सरपंच महिलेचे नाव आहे.
तालुक्यातील नवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे वाल कमपाऊंड बांधकाम काम कऱण्यात आले. कामाचे बिल काढण्यासाठी धनादेश (चेक) वर स्वाक्षरी करण्यासाठी येथील महिला सरपंच कुमरे ह्यांनी कंत्राटदार यास तब्बल 80, 000 रु. ची मागणी केली.
परिणामी, कंत्राटदार यांनी थेट यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार केली व सापळा रचण्यात आला. मात्र, सरपंच महिलेस साशंकता निर्माण झाल्याने रक्कम घेण्यास टाळाटाळ करीत होत्या. दरम्यान, पुरेशी माहिती आणि बळकट पुराव्याने सरपंच कुमरे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल करुन अटक केली. या घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.










