कार्यकाल संपल्याचे कारण सांगून जबाबदाऱ्या झटकणारे नगरसेवक आता जनतेच्या दरबारात…

0
634

कार्यकाल संपल्याचे कारण सांगून जबाबदाऱ्या झटकणारे नगरसेवक आता जनतेच्या दरबारात…
म्हणे मीच खरा जनसेवक,  जनतेचे होत आहे मनोरंजन..

मिडियाने जवाबदारी ओळखावी….

राजु तुरणकर – संपादक.

2 डिसेंबर 2025 रोजी वणी नगर पालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी नगरसेवक जनतेला निवडूण द्यायचे आहे. 2016 ला निवडणूका झाल्या होत्या त्या नगरसेवकांची कारकीर्द 2021 ला संपली. त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देश्यात दर पाच वर्षांनी निवडणूका होत असतात. परंतू भाजपचे सरकारचे डाव सामान्य जनतेला कळणे कठीण आहे. तब्बल चार वर्षांचा काळ उलटला तरी निवडणूका न घेतल्याने जनतेच्या मनात प्रचंड खदखद व्यक्त होत होती, अश्यातच संपुर्ण महाराष्ट्रा राज्यातील त्यानुसार राज्यात एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर होतील.

मात्र 2021 ते 2025 या संपलेल्या कार्यकाळात जी मंडळी नगरसेवक होती ती जनतेला आमचा कार्यकाळ संपला असे सांगून आता आमच काही चालत नाही , नगर परिषद मध्ये प्रशासक असे सांगुन जनतेला ठेंगा दाखवायची, जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांच्या जवळ वेळ नव्हती, आता मात्र निवडणूका लागताच सोसियल मीडियावर जनतेचे खरे सेवक, परिवर्तन घडवू, समाज सेवक, दांडगा जनसंपर्क अश्या पदव्या स्वतःला लावून (पेड न्यूज) पैसे देवून स्वस्त झालेल्या अस्तित्वहिन मीडिया कडून बातम्या छापून घेतात व स्वतःला धन्य समजून घेण्याची फार मोठी क्रेझ निर्माण झाली आहे… जनतेचे मात्र हे सर्व प्रकार पाहून जबरदस्त मनोरंजन होत आहे.
अश्या आविर्भावात वागणाऱ्या सत्तापिपासू प्रवृत्तीच्या व जनतेला मूर्ख समजणाऱ्या निवडूण आल्यानंतर जनतेला रस्त्यावर दर्शन न देणाऱ्या व आपली नैतिक जबाबदारी झटकून टाकणाऱ्या पांढरपेशा लोकांना आता येणाऱ्या निवडणूकीत मतदार धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाही हेही तेवढंच खरं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here