माजी आमदार विश्र्वासभाऊ नांदेकर यांचे मुंबई येथे निधन.

0
1459

माजी आमदार विश्र्वासभाऊ नांदेकर यांचे निधन..
मुंबई येथे सुरू होते उपचार…

लढवय्या नेतृत्वाला लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी विधानसभेचे माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे) गटाचे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा संपर्क प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचे रविवारी मध्यरात्री 11.05 मिनिटांनी मुंबई येथे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी मध्यरात्री अचानक तबीयत मध्ये बिघाड झाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
धडाडीचे नेते म्हणून ओळख असलेले विश्वास भाऊ रामचंद्र नांदेकर यांनी 2004 ते 2009 या काळात वणी विधानसभेचे आमदार म्हणुन नेत्रुत्व केले. शिक्षकी पेशातून, जिल्हापरिषद सदस्य ते आमदार ते संपर्क प्रमुख असा जीवनातील राजकीय प्रवास करीत असताना त्यांची नेतृत्व शैली संघटनेवर एकहाती पकड व प्रशासनावर वचक ठेवणारी होती. राजकीय भारदस्त व्यक्तिमत्व व जनतेसाठी सदैव झटणारे, कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील राजकारणी म्हणून ते जनतेत लोकप्रिय होते.

त्यांचे शारीरिक व्याधींनी ते मागील अनेक दिवसापासून त्रस्त होते. मागील दोन महिन्यापूर्वी त्यांच्या पायाच्या गुडध्याचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर मागील एक महिन्या पासून ते मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जावून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तबीयत ची विचारपूस केली होती.
त्यांच्या निधनाने वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
मुंबईवरून त्यांचे पार्थिव शरीर वणी येथील राहते घरी आणून अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने लढवय्या नेतृत्वाला भावपुर्ण श्रद्धांजली.
पुढील माहिती घेवून पार्थिवावरअंतिम संस्कार करण्या अनुषंगाने बातमी अपडेट करण्यात येइल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here