रवींद्र वांढरे यांना पितृशोक.

0
301

रवींद्र वांढरे यांना पितृशोक.
मैत्री कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले उद्धवजी वांढरे यांचे निधन.

राजू तुरणकर – वणी . राजूर (ई) गावातील वॉर्ड क्रमांक १ येथील रहिवासी तसेच मागील चार दशकांपासून कॉलरी येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी उद्धवजी मोतीराम वांढरे (वय ८० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे उपचारादरम्यान आज दुपारी ३.०० वाजता दुःखद निधन झाले. ते रवींद्र व सतीश वांढरे यांचे वडील होते.
उद्धवजी वांढरे यांची राजूर येथील बालपणापासूनची मुरलीधर मिलमिले यांच्याशी असलेली मैत्री, संपूर्ण वणी तालुक्यात आदर्श मानली जात होती. मैत्री कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच उद्धवजी वांढरे यांचे जीवन होते. जीवनातील प्रत्येक निर्णय त्यांनी एकमेकांशी सल्लामसलत करून घेतला. कोणतीही तक्रार न करता आयुष्यभर एकत्र व्यवसाय करीत त्यांनी विश्वास, प्रामाणिकपणा आणि समंजसपणाचा आदर्श घालून दिला.
अशा या आदर्श मैत्रीचा आज अंत झाला असला, तरी त्या मैत्रीचा वारसा रवींद्र वांढरे व बालाजी मिलमिले पुढे चालवत आहेत. त्यांच्या निधनामुळे वांढरे परिवार व मिलमिले परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक : २० जानेवारी २०२६ (मंगळवार)
वेळ : सकाळी ११.३० वाजता राजूर (ई) इजारा स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here