श्री आदर्श नागरी पतसंस्थेत आर्थिक नियोजन प्रशिक्षण उत्साहात संपन्न.

0
241

श्री आदर्श नागरी पतसंस्थेत आर्थिक नियोजन प्रशिक्षण उत्साहात संपन्न.

उज्वल भविष्याकडे वाटचाल करत,अल्पावधीत वणी कर जनतेच्या मनात विस्वास निर्माण करणारी एकमेव पतसंस्था.

वणी : श्री आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नोंदणी क्र. 140) वणी येथे संस्थेच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवार, दि. 30 मे 2026 रोजी “आर्थिक नियोजन” या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये संस्थेची तसेच सभासदांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक आणि भविष्यातील आर्थिक नियोजन यासंदर्भात उपयुक्त माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्थिक सल्लागार व Indian Institute of Management Ahmedabad (IIM अहमदाबाद) येथील माजी विद्यार्थी मा. श्री. अनिकेत दीपक मोहितकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी याबाबत मौल्यवान माहिती मिळाली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल गोहोकार, उपाध्यक्ष श्री. सुगम गोहोकार, व्यवस्थापक श्री. कुणाल नागमोते तसेच संस्थेचे कर्मचारीवृंद आणि विविध दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून आगामी सहकारी वर्षासाठी संस्थेच्या आर्थिक वाटचालीस या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

उज्वल भविष्याकडे वाटचाल करत,अल्पावधीत वणी कर जनतेच्या मनात विस्वास निर्माण करणारी एकमेव आदर्श नागरी सहकारी पतसंस्था वणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here