श्री गणेश गृहनिर्माण सोसायटी च्या “53 प्लॉटचा खेळ… ऑडिटमध्ये आकडेच गायब?”

0
388

श्री गणेश गृहनिर्माण सोसायटी च्या “53 प्लॉटचा खेळ… ऑडिटमध्ये आकडेच गायब?”

कुठे 51 तर कुठे 48 प्लॉट; ऑडिट कंपन्यांच्याही भूमिकेवर संशय.

राजु तुरानकर वणी :श्री गणेश गृहनिर्माण सहकारी सोसायटी प्रकरणात आता केवळ संचालक मंडळच नव्हे, तर ऑडिट करणाऱ्या कंपन्यांच्याही भूमिकेवर संशयाची सुई फिरू लागली आहे. अधिकृत नकाशानुसार संस्थेत तब्बल 53 प्लॉट अस्तित्वात असताना विविध ऑडिट अहवालांमध्ये वेगवेगळे आकडे दाखविण्यात आल्याने मोठा आर्थिक घोटाळा दडपण्याचा प्रयत्न झाला काय? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

महिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्राचे माहितीनुसार, काही ऑडिट अहवालांमध्ये 51 प्लॉट नमूद करण्यात आले आहेत, तर काही अहवालांमध्ये थेट 48 प्लॉट दाखविण्यात आले. अधिकृत नकाशा, सदस्य नोंदवही आणि ऑडिट अहवाल यामध्ये एवढी मोठी तफावत नेमकी कशी निर्माण झाली? यावर आता सहकार विभागाकडून सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात असून  आहे.

विशेष म्हणजे, ऑडिट ही प्रक्रिया संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता तपासण्यासाठी केली जाते. मात्र याच प्रकरणात ऑडिट अहवालांतील आकडेच वर्षागणिक बदलत गेल्याने “ऑडिटच्या नावाखाली व्यवस्थापनाला क्लीनचिट देण्याचा खेळ झाला काय?” अशी जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही वर्षांचे ऑडिट अहवाल गायब असल्याची बाबही समोर येत आहे. तर उपलब्ध अहवालांमध्ये प्लॉट संख्येतील विसंगती स्पष्टपणे दिसून येत असल्याने संबंधित ऑडिट कंपन्यांनी प्रत्यक्ष जागेची पडताळणी केली होती की फक्त कागदोपत्री अहवाल तयार करण्यात आले? याची चौकशी करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. की आता ऑडिट कंपन्यांच सुद्धा ऑडिट होणार हा प्रश्र्न उपस्तीत झाला आहे.

दरम्यान, 6 मे 2026 रोजी राजु तुरानकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार वणी सहायक निबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर संस्थेचे दप्तर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पुढील काळात आर्थिक व्यवहारांची तपासणी, बँक व्यवहारांवर निर्बंध, प्रशासक नियुक्ती, तसेच जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“ 53 चे 48 करणाऱ्यांवर आता कारवाई होणार का?” याकडे संपूर्ण वणीकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here