“सामाजिक, राजकीय, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात भक्कम पायाभरणी…..आता बिल्डर क्षेत्रात होनार दमदार एन्ट्री !”
समाजासाठी जगणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा उद्या वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी होनार साजरा.
गोरगरीब जनतेच्या मनातील नेतृत्व; लोकांच्या सुख-दुःखात कायम धावणारे नाव…
राजु तुरानकर – संपादक लोकवाणी जागर.
वणी परिसरात सामाजिक, राजकीय, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे संजय खाडे हे लोकप्रिय नेतृत्व आता बिल्डर क्षेत्रातही दमदार एन्ट्री करण्याच्या तयारीत असून त्यांच्या 23 मे 26 ह्या वाढदिवसानिमित्त विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविणे, गरजूंना मदतीचा हात देणे, युवकांना मार्गदर्शन करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने लोकांमध्ये राहणारे हे नेतृत्व आज गोरगरीब जनतेच्या मनातील विश्वासाचे नाव बनले आहे.

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, फळवाटप, सामाजिक उपक्रम तसेच जनसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. “समाजासाठी जगणारे नेतृत्व” अशी ओळख निर्माण केलेल्या संजय खाडे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सामाजिक कार्यातून उभे राहिलेले हे नेतृत्व आता विकासाभिमुख दृष्टीकोनातून बिल्डर क्षेत्रात नवी वाटचाल सुरू करणार असल्याची चर्चा असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामाजिक, सहकार व जनसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे लोकप्रिय जय जगन्नाथ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी वणी चे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मानाचा मुजरा..!
बँकेच्या माध्यमातून अनेक गरजू, शेतकरी, व्यापारी व सामान्य कुटुंबांना आर्थिक आधार देत संस्थेला नवी भरारी मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेवर लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून विकासाची नवी दिशा मिळाली आहे.

समाजासाठी सातत्याने झटणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा..!













