पोलिसांच्या बुलडोझर कारवाईचा जबरदस्त धडाका…! 

0
1141

पोलिसांच्या बुलडोझर कारवाईचा जबरदस्त धडाका…! 

मटका अड्डे बंद… सगळे बुक्की गायब…? नेते चिंता ग्रस्त.

राजु तुरानकर – संपादक.

वणी शहरातील अवैध मटका व्यवसायावर काल पोलिसांनी कडक भूमिका घेताच अनेक मटका किंग गाव सोडून फरार झाल्याची चर्चा रंगली आहे.

आजपासून पोलिसांची विशेष मोहीम सुरू झाली असून शहरातील सर्व अवैध गतिविधींवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती.

मटका अड्डे बंद… सगळे बुक्की गायब…?

आणि आता काही नेतेमंडळी मात्र चिंतेत…! “बॅनरचे पैसे आता कोण देणार…?” अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सामान्य नागरिकांकडून मात्र पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत करण्यात येत असून, “अवैध धंदे बंद झाले तर शहर शांत होईल” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here