आनंद वार्ता
आज लोकार्पण सोहळा साई मित्र परिवार चा स्तुत्य उपक्रम आणि पुढाकार..
मारेगाव वासियांच्या सेवेत, रुग्णवाहिका.
आनंद नक्षणे –मारेगाव.
अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व रामलल्ला यांचा अभिषेक सोहळाचे औचित्य साधून शहर आणि तालुक्यातील गरजू रुग्णांच्या सेवेत सर्व सुविधापूर्ण २४ तास सेवेत राहणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा साई मित्र परिवार सदस्यांच्या उपस्थितीत मार्डी चौक येथे 22तारखेला सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या सेवेत एक रुग्णवाहिका असावी यासाठी साई मित्र परिवाराच्या सदस्यांनी तन मन धनाने काम आणि कार्य अवरीत सुरु ठेवण्यासाठी तालुयातील नागरिकांना वेळेवर जिल्हा रुग्णालयात पोहोचून आपले अमूल्य जीव वाचविता यावे यासाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाकडून उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध होऊ शकत नसल्याने अपघातग्रस्त, गंभीर आजारी, श्वान, सर्पदंश, वन्य प्राण्यांचा हल्ला इत्यादी झालेले रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने कुठल्याही वैद्यकीय सोयी नसलेल्या खाजगी वाहनांद्वारे जीव धोक्यात घालून जावे लागते.ज्यामध्ये बरीच जीवितहानी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सुद्धा झाली आहे. उपरोक्त सर्व बाबींचा सारासार विचार करून साई मित्र परिवाराच्या सदस्यांच्या प्रयत्नाने जनते साठी सेवेचा संकल्प केला आहे. या लोकार्पण सोहळ्याला मारेगाव वाशीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.