वणी शहरात भव्य श्री श्याम धाम फाल्गुन उत्सवाचे आयोजन.

0
356

वणी शहरात भव्य श्री श्याम धाम फाल्गुन उत्सवाचे आयोजन.

दोन दिवसीय भव्य भजन संध्या सहित महाप्रसादाने, फाल्गुन महोत्सवात वणीकर जनता होणार मंत्रमुग्ध.

राजू तुरणकर वणी : वणी शहरातील योगीराज नगर येथे असलेल्या श्री श्यामबाबा मंदिरात दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य “श्री श्याम धाम फाल्गुन उत्सव – वृंदावन रस में” मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. श्री श्याम सेवा समिती, वणी यांच्या वतीने या धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भव्य निशान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० वाजता भजन संध्या होणार असून, वृंदावन येथील लाडली थी रिथिमा श्री जी यांच्या मधुर भजनांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले जाणार आहे. रात्री ८.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. कोलकाता येथील प्रसिद्ध भजन गायक डॉ. हरीश भारती हे आपल्या सुमधुर वाणीने भजन सादर करणार आहेत. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

“करने वाला श्याम, कराने वाला श्याम” या घोषवाक्याखाली श्री श्याम सेवा समिती, वणी यांच्या वतीने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व खाटू श्याम भगवान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here